औरंगाबाद : अपघातामध्ये मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या विरहातून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी गारखेडा भागातील गजानन नगर भागात गल्ली नंबर ९ मध्ये ही घटना घडली. ऋषिकेश गणेश धांडगे (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो लाडगाव येथे अकरावीचे शिक्षण घेत होता. त्याचा मोठा भाऊ रोहित याचा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता अपघातात मृत्यू झाला होता.

औरंगाबाद-नगर रस्त्यावरील छावणी रेल्वे ब्रिजजवळ ट्रकबरोबर हा अपघात झाला होता. तेव्हापासून ऋषिकेशला धक्का बसला होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. दोघे भाऊ दरवर्षी मकरसंक्रातीला पतंग उडवित असत. त्या आठवणीच्या तणाव व नैराश्यातून ऋषिकेशने रविवारी रात्री साडेनऊ वाजता घरात पंख्याला रुमाल बांधून गळफास घेतला.

ठाण्यात खळबळ! कामगार रुग्णालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाकीत सापडला मृतदेह

हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने ऋषिकेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले. रविवारी रात्री पावणेअकरा वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here