ठाणे : काही दिवसातच मानखुर्द (Mankhurd) ते ठाणे (Thane) हे अंतर आता अवघ्या ५ मिनिटात कापता येणार आहे. कारण एमएमआरडीए (MMRDA) शहर वाहतूक सुधारणा प्रकल्पा अंतर्गत मानखुर्द- ठाणे उड्डाणपुलाचं (Mankhurd-Thane Flyover) काम सुरू केले आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून सोमवारी रात्री या उड्डाणपुलाचा शेवटचा गर्डर बसवण्यात येणार आहे. उर्वरित काम हे लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. तर १५ फेब्रुवारीपासून या फुलावरून वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे, असा दावा एमएमआरडी कडून करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून मानखुर्द ते ठाणे हे अवघ्या पाच मिनिटात पोहोचता येणार आहे. एक्सटर्न एक्सप्रेसच्या छेडा नगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हेच लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच एमएमआरडीने छेडा नगर वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगरमध्ये तीन उड्डाणपूल आणि एक मेट्रो बांधण्याचे काम सुरू आहे.

घरांच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण; दोन हजार गिरणी कामगारांचा सहभाग
या तीन पदरी फुलांपैकी पहिला पूल हा ६८० मीटर लांबीचा आहे. तो सायन, शिव आणि ठाणे या तीन महानगरांना जोडला जातो. दुसरा उड्डाणपूल हा १२३५ मीटर लांबीचा असणार आहे तर तिसरा थेट मानखुर्द रोड मार्गे ठाण्याला जोडला जाणार आहे यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च केले असल्याचीदेखील माहिती आहे. इतकंच नाही तर ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल हा मार्च २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल चेंबूरला जोडला गेला असून यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. ५१८ मीटर लांब आणि ३७.५ मीटर रुंद भुयारी मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता शेवटचे दोन गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. यातला पहिला गडर सोमवारी तर दुसरा गडावर त्याच दिवशी रात्री बसवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल. हा पूल सुरू झाल्यास सर्वप्रथम मानखुर्द ते ठाणे अवघ्या पाच मिनिटात पोहोचता येणार आहे तर छेडा नगरमधील वाहतूक कोंडीची समस्याही दूर होणार आहे, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

दहिसरमध्ये फिल्मी स्टाइलने चोरी; तुरुंगात मैत्री अन् बाहेर येताच घरफोड्या, तिघांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here