कोल्हापूर: शहरातील २७ खासगी रुग्णालये महापालिकेच्या ताब्यात घेण्याबरोबरच येथे केवळ बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ उपचार न झाल्याने शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा शनिवारी चार हजारावर पोहोचला असून आत्तापर्यंत १०२ लोकांचा यामध्ये बळी गेला आहे. ( )

वाचा:

जिल्ह्यात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या व उपलब्ध बेड यांचा ताळमेळ बसत नसल्याने उपचारांवर परिणाम होत आहे. शुक्रवारी बेड नसल्याचे कारण सांगत उपचारास नकार दिल्याने तिघांचा तडफडून मृत्यू झाला. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने शनिवारी शहरातील २७ खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन त्यासाठी महापालिकेचे अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले. या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येतील. इतर रुग्णांसाठी काही बेड आरक्षित ठेवण्यात येतील.

वाचा:

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केवळ करोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयासह जिल्ह्यातील पाच ठिकाणी उपचार केले जात आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने या सर्वावर उपचार होण्यासाठी हे रुग्णालय केवळ करोना बाधितांच्या उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. हा आकडा शनिवारी चार हजारावर पोहोचला. आतापर्यंत १०२ लोकांचा बळी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, भाजपने आरोग्य यंत्रणेनेवर आरोप करत जिल्ह्यातील परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यात आरोग्य यंत्रणाा कमी पडत असल्याचे म्हटले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी सकाळी आरोग्य विभागाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here