Gold and Silver Rate Hike Today: पौष महिना सरताच आता लगीनसराई सुरू होईल. मात्र लग्नाचे वेध लागलेल्यांना आणि त्यांच्या पालकांना सोन्याचे दर मात्र घाम फोडणार आहेत. सोन्याच्या दरांत गेल्या काही दिवसांत दिवसेंदिवस वाढ होत असून आज सोन्याच्या दरानं (Gold and Silver Rate Hike) आज पर्यंतचा उच्चांक गाठला असून सोन्याचे दर (Gold Rate) हे दहा ग्राम शुद्ध सोन्याच्या साठी 58,500 रुपये इतके उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोनं व्यावसायिकांच्या मते, जागतिक पातळीवर सध्या वाढत असलेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता, अनेक देशांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदीकडे आपला कल वाढवला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे. 

याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. गेल्या आठवडा भरात सोन्याच्या दरांत प्रतितोळा दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतींत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. जे दर मागील आठवड्यात 56 हजार रुपये प्रतितोळ होते. तेच दर आज 57 हजार रुपये, तर जीएसटी सहित हेच दर आज जळगावच्या सुवर्ण नगरीत 58500 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. अजुनही हे दर वाढू शकतात, असा सोने व्यावसायिकांचा अंदाज आहे. 

सोन्याच्या दरांत वाढ झाल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या ग्राहकांवर झाला असून सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर हे दर असल्यानं अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरविली आहे. तर काहींनी आपलं बजेट बिघडलं असल्यानं कमी प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे.  

news reels

सोन्याचांदीचे दर वधारले… 

एकीकडे मंदीचे सावट आहे तर दुसरीकडे सोनं मात्र दिवसेंदिवस वधारत आहे. सध्या सोन्याचे दर 56  हजार 883 रुपयांच्या उच्चांकी दरावर पोहोचले आहेत. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होते. मात्र इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा झाला आहे. सोन्यसह चांदीनंही चांगलाच भाव खाल्लाय. चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी; 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत; प्रतितोळ्याचा दर 57 हजारांच्या आसपास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here