किरण खरात यांच्या तक्रारीनुसार, खरात यांचे जालना येथील राहते घर आणि काही प्लॉट्स, मालमत्ता विजय झोल यांनी लिहून घेतली. एवढ्यावरच न थांबता झोल यांनी आपले अंबड येथील सुखसागर हॉटेल नावे करून देण्यासाठी तगादा लावला असून जिवे मारण्याची धमकी देत सतत दबाव टाकत असल्याचंही किरण खरात म्हणतात. क्रिकेटर विजय झोल हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई आणि जालन्याचे प्रसिद्ध वकील हरिभाऊ झोल यांचे पुत्र आहेत.
जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कालच पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. ‘काही गुंड किरण खरात यांना मारण्यासाठी त्यांच्या गावी मंगरूळ येथे गेले होते, मात्र गावकरी जमा झाल्याने दुर्घटना टळली. काल किरण खरात हे जालना येथे तक्रार देण्यासाठी येत होते. परंतु त्यांना पोलिसांनी अडवल्याने तक्रार दाखल झाली नव्हती,’ असा आरोप आहे. काल रात्री उशिरा घनसावंगी पोलीस ठाण्यात किरण खरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा तो कदम जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तसंच काल रात्रीच जालना पोलीस ठाण्यात किरण खरात यांच्याविरोधातही फसवणुकीची तक्रार दाखल झालेली आहे.
Hello esy.es Webmaster, very same right here: Link Text