नगर: ‘कंटेनमेंट झोनचा कालावधी जास्त असल्यामुळे काही ठिकाणी लोकांचा उद्रेक होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आम्ही कंटेनमेंट झोनचा कालावधी कमी करण्याबाबत विनंती करणार आहोत. येथील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती,’ असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे मंत्री यांनी स्पष्ट केले. आज सांगली येथे संतप्त नागरिकांनी बॅरिकेट्स आणि पत्रे काढून उद्ध्वस्त केला असून त्यावर पाटील बोलत होते. ( On )

वाचा:

नगरच्या भवन येथे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सांगली येथे कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त करण्याच्या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘सांगलीमध्ये अँटीजेन टेस्टचे आपण सॅम्पल घेतले होते, आणि त्याठिकाणी पत्रे ठोकून कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. हे कंटेनमेंट झोन २८ दिवसाचे आहेत. रुग्ण हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला तरी केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे कंटेनमेंटचा कालावधी मोठा असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे अवघड होते. त्यामुळे काही ठिकाणी लोकांचा उद्रेक होतो. त्यामुळे कंटेनमेंट झोनचा कालावधी कमी करण्याची आम्ही विनंती करणार आहोत. कारण आपण पूर्वी १४ दिवस बाधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ठेवायचो, आता त्याला सात दिवसात परत पाठवत आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनची मर्यादा कमी करता येते का, हे बघण्याचे काम आपण केले पाहिजे.’

वाचा:

राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन बाबत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘लॉकडाऊन जर केला तर लोकांचा संचार कमी होतो. लोकांचा संचार कमी झाला, तर प्रादुर्भावाचा वेग कमी होतो. संसर्ग कमी झाला, तर निर्माण होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. पण लॉकडाऊन हा अत्यंत टोकाचा उपाय आहे. मात्र, काही जिल्ह्यामध्ये बेडची संख्या मर्यादीत आहे. बेड कमी असतील, आणि रुग्णांची संख्या वाढली तर एवढ्या रुग्णांना कुठे ठेवणार ? ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच बाकीच्या ज्या सुविधा लागतात, त्यासर्व जिल्ह्यात परिपूर्ण नाहीत, हजार रुग्ण झाले तरी आपण त्यांना ठेवू शकतो, अशी परिस्थिती सर्व जिल्ह्यात आज तरी नाही. मुंबई, पुणे, नागपूर महापालिका हद्दीत हे शक्य आहे. पण अन्य ठिकाणी जेथे शक्य नाही, तेथे लॉकडाऊन करणे हा पर्याय आहे.’

वाचा:

सांगलीत नेमकं काय घडलं?

सांगलीत अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केलेल्या नागरिकांपैकी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी शहरातील इंदिरानगर परिसर सील केला होता. मात्र, संपूर्ण इंदिरानगर सील झाल्याने नागरिकांनी याला जोरदार विरोध केला. शनिवारी दुपारी संतप्त नागरिकांनी बॅरिकेट्स आणि पत्रे काढून कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त केला. याशिवाय वैद्यकीय तपासणीलाही नागरिकांकडून विरोध सुरू आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here