Pune Crime News :  लग्नाचं आमिष दाखवून राहत्या (Pune crime) घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 ते जून 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ओळखीच्या 19 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर सहा महिने लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान मुलीला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. ही सगळी माहिती मिळताच मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. 

दोघेही मित्र होते…

दोघेही एकाच परिसरात राहयला होते. दोघांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. मुलाने 13 वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला होता. त्यावेळी तिला प्रेम असल्याचं सांगितलं आणि लग्न करण्यासंदर्भात जबरदस्ती केली. मुलगी 13 वर्षाची असल्याने मुलीच्या अज्ञातपणाचा त्याने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकदा राहत्या घरी नेऊन तिचा लैंगिक छळ केला. 

पोटात दुखल्यावर गर्भधारणा झाल्याचं उघड…

हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागलं. त्यावेळी आईने मुलीला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. यात धक्कादायक रिपोर्ट समोर आला. मुलगी 28 आठवडे गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून आईला धक्का बसला आणि आईने मुलीकडे विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

news reels

डिसेंबर महिन्यातही असाच प्रकार समोर

बाल विवाह करणे हा गुन्हा असतानादेखील बालविवाह करुन दिल्याने 12 वर्षीय मुलगी गर्भवती राहिती होती. पुण्यातील चाकण परिसरातून ही घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मे 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडला होता. या संदर्भात महिला कर्मचाऱ्याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पीडित मुलीचा पती राहुल शिवाजी भले यांच्यावर पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here