इंदूरः मध्यप्रदेशमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली आहे. इंदूर येथील ५२ वर्षांच्या ब्रेन डेड महिलेने अनेकांना नवीन आयुष्य दिलं आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी त्वचा, डोळे, किडनीसह हातही दान करण्याची तयारी दर्शवली आहे. कुटुंबीयांच्या या निर्णयामुळं मुंबईतील एका १८ वर्षांच्या तरुणीवर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया शक्य होणार आहे. इंदूर येथे राहणारी विनीता खजांची १३ जानेवारी रोजी अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची तब्येत अधिक खालावली व १५ जानेवारी रोजी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आलं. त्यावेळी कुटुंबीयांनी सामाजिक भान राखत अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यांनी फफ्फुस, यकृत, किडनी, डोळे, त्वचा दान करण्यास परवानगी दिली.वाचाः विनीता यांचे इतर अवयव वेगवेगळ्या राज्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले. तर, हात मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले. मुंबईतील १८ वर्षीय तरुणी जन्मतः एका आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर हाताचे प्रत्यारोपण करण्याची गरज होती. तरुणीवर बॉम्बे रुग्णालयात सोमवारी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. वाचाः जिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे तिच्या वाढदिवशीच विनीता खंजाची यांचा मृत्यू झाला होता. या विचित्र योगायोगाची सध्या चर्चा सुरु आहे.वाचाः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here