रायपूर: छत्तीसगडच्या कोंडागावमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. कोंडागाव बस स्थानक परिसरात ही घटना घडली. इरागावचा रहिवासी असलेल्या बिसनाथ दुग्गानं आत्महत्या करत जीवनप्रवास संपवला. बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे.

आत्महत्या करण्यासाठी बिसनाथनं चालत्या बसच्या मागच्या चाकाखाली उडी मारली. पुढच्या काही क्षणांमध्ये बिसनाथ चाकाखाली आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मर्सिडीज इंजिनीयरचा संशयास्पद अंत; बँकर पत्नी, आई, लेकीचेही मृतदेह सापडले; बदली ठरली कारण?
बिसनाथ दोन दिवसांपूर्वीच कोंडागावला आला होता. एका नातेवाईकाच्या घरात तो मुक्कामाला होता. सोमवारी घरी परतण्यासाठी त्यानं बस स्थानक गाठलं. रायपूरहून जगदलपूरला जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसखाली त्यानं उडी घेतली. हा प्रकार पाहून आससासच्या लोक ओरडले. त्यांचा आवाज ऐकून बस चालकानं लगेच ब्रेक दाबला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
लाल ऑडी, हुशार मॅकेनिक अन् U; पोलिसांनी अखेर स्विटीच्या गुन्हेगाराला शोधलंच
गंभीर जखमी झालेल्या बिसनाथला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बिसनाथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here