अमरावती, प्रतिनिधी: गुन्हेगार व आरोपींना ठेवण्यात येणाऱ्या कारागृहात कार्यरत कर्मचारी महिलेचे पोलीस क र्मचाऱ्याने शोषण केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महिलेने धाडस करून शोषण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे.

याप्रकरणातील पीडित महिला ही कारागृहात कार्यरत आहे. तर आरोपी (३०) हा पोलीस मुख्यालयातील श्वान पथक विभागात कार्यरत आहे. मुकेश यादव याने पीडितेला लग्नाचे आमीष देवून घरातून फूस लावून पळवून नेले होते. लग्नानंतर घर आवश्यक असल्याचे त्याने पीडितेस सांगितले होते. यासाठी तिच्याजवळून मुकेश यादव याने दहा लाख रूपये देखील घेतले होते. सोबतच सोन्याचे दागिने घेण्यात आले होते. पीडित कारागृह कर्मचारी महिला व आरोपी पोलीस कर्मचारी सोबत राहत होती. त्यांनी विकत घेतलेल्या घराचे हफ्ते देखील भरण्यात येत होते. सदर पोलीस कर्मचारी पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. या काळात त्याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण देखील केली. नवीन संसाराचे स्वप्न पाहतांना मिळत असलेली अपमानास्पद वागणूक, शारीरिक शोषण व आर्थिक फसवणूक यास कंटाळून अखेर पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलीसांनी मुकेश यादव याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३६३,३७६(२), (एन),३५४(डी), ४०६,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास गाडगेनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्याने कारागृहातील कर्मचाऱ्याचे शारीरिक शोषण करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here