छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ हा अपघात झाला. बीडकडून एक विस्टा कार (MH.23.AD.1620) गेवराईच्या दिशेने येत होती. त्यावेळी पाठीमागून येणारी स्कूल बस (MH.12.EQ.1671)ने कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कार चालक बचावला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतू पाठीमागून येणारी दुचाकी (MH.04.DP.7358)ने स्कूलबसला पाठीमागून जोराची धडक दिली.
यात दुचाकीस्वारासोबत एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेले दोघेजण गढी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर घटनेचा पंचनामा गेवराई पोलीस करत असून पुढील तपास सुरु आहे.