Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून जन्मदात्या बापानेच मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंबड परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

नाशिक शहरात गुन्हेगारी (Crime) काही थांबायचं नाव घेत नाही. सर्रास चॉपर, कोयते आदी हत्यारांनी प्राणघातक हल्ल्याच्या घटना राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले जात असताना नाशिक पोलिसांची निष्क्रियता वाढत्या गुन्हेगारीमुळे दिसून येत आहे. अशातच नाशिक शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या अंबड लिंकरोड भागातील रामकृष्ण नगर परिसरात येथील शिव व्हिला अपार्टमेंट येथे खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून जन्मदात्या बापाने आपल्या 24 वर्षीय मुलीचा गळा आवळून जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

मुलीच्या लग्नावरुन वाद, राहत्या घरी ओढणीने गळा आवळला

नाशिकच्या अंबड लिंक (Ambad Police) रोडवरील चुंचाळे परिसरातील ही घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच ओढणीने गळा दाबून आपल्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस  झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात रामकिशोर भारती यांचं कुटुंब राहते. त्याच्यासोबत त्याची मुलगी ज्योती ही पण राहते. काही दिवसांपासून राम किशोर आणि ज्योती या दोघांमध्ये ज्योतीच्या लग्नावरुन वाद सुरु होते. या वादातून ज्योती ही दोन वेळा घरातून निघून गेल्याचे समजते. काल देखील ज्योती हिने वडील राम किशोरला घरातून निघून जाण्याची धमकी दिली होती. याचा राग आल्याने रागाच्या भरात रामकिशोरने आपल्या राहत्या घरी मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक माहिती आहे..

बापाला बेड्या

घटनेची माहिती आज सकाळी अंबड पोलिसांना समजल्यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक किरण शेवाळे उपनिरीक्षक नाईद शेख आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच याप्रकरणी संशयित रामकिशोर यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत. 

news reels

किरकोळ वादातून घडली घटना… 

अंबड परिसरातील (Ambad Area) एक्सलो पॉईंट येथील घटना असून या ठिकाणी राहणाऱ्या भारती कुटुंबातील ज्योती भारती या तरुणीचा खून झाला आहे. ज्योती हिच्या बापानेच खून केल्याचे समोर आले आहे. वारंवार किरकोळ कारणावरुन मुलगी घर सोडून जात असल्याचा राग अनावर झाल्याने पित्याने मुलीचा गळा आवळून खून केला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती रामकिशोर भारती असे खून झालेल्या मुलीचे नाव असून ती घरात होणाऱ्या किरकोळ कारणाच्या भांडणावरुन घर सोडून निघून जात असल्याने तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत होता. त्यामुळे तिचे वडील रामकिशोर भारती यांना राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here