Jalna Crime News: कोरोना (Corona) काळात बालविवाहाच्या (Child Marriage) घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. मात्र त्यानंतर देखील बालविवाहाच्या प्रमाणात सतत वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात (Jalna District) देखील बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवाईवरुन दिसून येते. कारण महिला व बालविकास विभागाच्या वतीने गत वर्षभरात 56 बालविवाह रोखण्यात आले आहे. दरम्यान अनेकदा माहिती न मिळाल्याने बालविवाह रोखण्यात अपयश येत आहे. 

करोनामुळे समाजात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. त्यात उदरनिर्वाहाचा निर्माण झालेला प्रश्न, लग्नासाठी लागणारा खर्च आणि लग्नाच्याबाबतीत कायदेशीर माहिती नसल्याने अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावण्याच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. प्रशासन आणि सरकारकडून अनकेदा आवाहन करुन देखील बालविवाहाचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. जालना जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. तर जालना जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्यावतीने गत वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये 56 बालविवाह रोखण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 19 बालविवाह जालना तालुक्यात रोखण्यात आले आहेत. 

समित्या नावापुरत्याच… 

राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येतात. मात्र अनकेदा या समित्या नावापुरत्याच आणि कागदावरच असल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी फोटो-व्हिडीओग्राफर, मंडप व्यवसायिक, हॉल मालक यांच्याकडे विवाहाचे बुकिंग करतानाच मुला-मुलींचा जन्मदाखला पाहणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात हे नियम पाळले जात नाहीत. तर गावपातळीवर बालविवाह रोखण्यासाठी समिती स्थापन करण्यात येते, पण त्यांच्याकडून देखील हवी तशी कारवाई होत नसल्याचे पाहायला मिळते. 

कायदा काय सांगतो? 

अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण वाढले होते, म्हणून शासनाने मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे होण्यापूर्वी त्यांचे लग्न होऊ नये, यासाठी बालविवाह प्रतिबंध कायदा लागू केला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर महिला व बालविकास विभाग, पोलिस चाईल्ड लाईनचे पथक कारवाई करते. संबंधितांचे समुपदेशन करुन त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाते.

news reels

बालविवाह रोखल्याची आकडेवारी अ.क्र. तालुका  विवाह रोखले 
1 भोकरदन  13
2 जालना  19
3 बदनापूर  03
4 परतूर  04
5 जाफराबाद  03
6 मंठा  01
7 घनसावंगी  08
8 अंबड  05
  एकूण  56

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna News : क्रिकेटपटू विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल, क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून धमकावल्याचा आरोप

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here