म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरात करोनाचा संसर्ग वाढत असून त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. शहर जिल्ह्यात दिवसभरात २८९१ जणांना संसर्ग झाला असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय गंभीर रुग्णांच्या संख्येत भर पडत असून ऑक्सिजनवरील संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. तर ६९३ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत.

शहरात शनिवारी ६०९० एवढ्या जणांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे शहरात आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६७३ रुग्ण हे गंभीर आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापैकी ११५ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून ५५८ रुग्ण हे ऑक्सिजनवर असून ऑक्सिजनवरील संख्याही वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य खात्यापुढील आव्हाने वाढली आहेत. शहरात १८ हजार ४९४ रुग्ण सक्रीय आहेत.

शहर जिल्ह्यात ४७ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत १६६५ जण दगावले आहेत. शहरात २२ तर पिंपरी चिंचवडमध्ये ११, पुणे ग्रामीणमध्ये १० तसेच अन्य कँटोन्मेंट बोर्डातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here