मुंबई  :  दावोस (Davos) येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी 45 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी दिलीय. या गुंतवणूक करारांमुळे महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगतिले.  

जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसह विविध सामंजस्य करार करण्यात आले.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधींनी गर्दी केली आहे. 

“दावोस येथे पहिल्याच दिवशी 45 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे महाराष्ट्रावर उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे सिद्ध झाले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  यावेळी त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. 
 
पुणे येथे 250 कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याबरोबरच औरंगाबाद येथे 12 हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे.  या प्रकल्पामुळे  6 हजार 300 जणांना रोजगार मिळणरा आहे. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा 1 हजार 650 कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे. यामुळे 2 हजार रोजगार निर्मिती होईल. मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार आहे. यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेंत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

या सामंजस्य करारावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॅा. हर्षदिप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा उपस्थित होते.

news reels

महत्वाच्या बातम्या

एकेकाळी कट्टर विरोधक, आता लोकसभेसाठी एकत्र येणार, दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here