child kidnapped, होय, आम्हीच त्याला संपवलं, घरात पुरलं! चिमुकल्याचा जीव घेऊन सासू सुनांची कबुली; पोलीस सुन्न – two neighbors takes life of three year old child in parbhani after kidnapping
परभणी: जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून अंगणामध्ये खेळत असलेल्या तीन वर्षाच्या बालकाला घरामध्ये उचलून नेऊन सासू आणि सुनेने त्याचा खून केला. यानंतर त्यांनी चिमुकल्याचा मृतदेह घरातील फरशी खाली पुरला. ही धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर काळगाव परिसरामध्ये घडली आहे. कावेरी गजानन बनगर आणि अन्नपूर्णा बाळासाहेब बनगर असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर कळगाव परिसरातील गणेश भीमराव धोत्रे यांनी या प्रकरणात ताडकळस पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. गणेश धोत्रे यांची पत्नी शेतातून परत येत असताना त्यांचा मुलगा गोविंद गणेश धोत्रे (वय ३ वर्षे) याचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले. त्यावरुन कलम ३६३ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलीसकरीत होते. या गुन्ह्याची संवेदनशीलता ओळखून पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी चार पथके नेमण्याचे आदेश दिले. आळस दिला अन् जीव गेला; बॉडीबिल्डरची चटका लावणारी एक्झिट; मित्रांच्या डोळ्यांदेखत मृत्यू अपहृत बालक व अज्ञात आरोपीचा शोध ताडकळस हद्दीत घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. गोविंदचे अपहरण आणि हत्या त्याच्याच शेजारी राहणाऱ्या कावेरी बनहरने केल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तिला ताडकळस पोलीस ठाण्यात बोलावून अपहृत बालकाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली. पिटबुलच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी; कुटुंबानं कुत्र्याला पकडून पकडून मारलं; निर्घृणपणे संपवलं जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने कावेरी आणि तिची सासू अन्नपूर्णा यांनी गोविंदला अंगणातून उचलले. त्यानंतर दोघींनी त्याला जीवे मारले आणि घरातील कोपऱ्यात पुरले होते. कावेरीने ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत गोविंदचा मृतदेह बनगर यांच्या घरातील फरशी खालून बाहेर काढला. आरोपी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ताडकळस पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.