Beed News: वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांची (Suicide Attempt) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील (Beed District) देखील गेल्या वर्षभरात 218 लोकांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तर या सर्वांचे समुपदेशन करून त्यांना तणावातून बाहेर काढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. विशेष म्हणजे यात शेतकऱ्यांचा देखील मोठ्याप्रमाणावर समावेश आहे. 

मानसिक तणावात असलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मानसिक आरोग्य केंद्रांतर्गत 104 आणि 1441 या क्रमांकावर समुपदेशन केले जाते. मागील वर्षभरात बीड जिल्ह्यातील 3 हजार 275 लोकांचे समुपदेशन बीड जिल्हा रुग्णालयात झाले आहे. तर बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात218 लोकांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचा देखील समुपदेशन करण्यात आले आहे. यात काही तरुण, तरुणींचाही समावेश आहे. तर यात शेतकरी देखील मोठ्याप्रमाणावर असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहेत. तर शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वात जास्त पुरुष आहेत. तसेच इतर कारणांनीही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यावरून महिलांपेक्षा अधिक ताण हे पुरुष घेत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

आत्महत्या करण्याचे कारणे काय? 

  • नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. 
  • लग्न होत नाही, कोणी मुलगी देत नाही, माझ्या मनासारखा पती भेटला नाही या कारणांनी तरुण, तरुणीं आत्महत्या करत आहे. 
  • घरात कोणी नीट बोलत नाही. सासूसोबत पटत नाही, सून नीट बोलतच नाही, नवरा सारखा दारू पिऊन मारझोड करतो यावरून देखील आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहेत. 
  • उसनवारीवर घेतलेले पैसे परत देणे होत नाही या कारणामुळे देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न लोक करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न आकडेवारी 


अ.क्र. महिना  आत्महत्या प्रयत्न आकडेवारी 
1 जानेवारी  23
2 फेब्रुवारी  20
3 मार्च  23
4 एप्रिल  22
5 मे 24
6 जून  22
7 जुलै  20
8 ऑगस्ट  15
9 सप्टेंबर  13
10 अक्टोबर  07
11 नोव्हेंबर  18
12 डिसेंबर  11

शेतकरी आत्महत्या अधिक! 

गेल्यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षात मराठवाड्यात एकूण 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक 202 शेतकरी एकट्या बीड जिल्ह्यातील आहे. त्यामुळे गेल्यावर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. 

news reels New Reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here