Nashik Crime : ओझर पोलीस ठाणे (Ojhar Police Thane) हद्दीतील आंबेडकरनगर परिसरात खुनाची (Murder) घटना घडली आली होती. त्यानुसार तपास सुरु असताना एकाच महिलेवर दोघांचे प्रेम असल्याच्या वादातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

नाशिक (Nashik) शहराजवळील ओझर भागातील आंबेडकर नगर परिसरात डिसेंबर 12 रोजी प्रमोद दत्तु निकाळजे याचा खून झाला होता. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपास सुरु असताना प्रमोद हा खून झाला त्या दिवशी कोणा-कोणास भेटला तसेच त्यास शेवटचे कोणासोबत पाहीले याबाबत तपास सुरू केला. त्याप्रमाणे प्रमोद राहत असलेल्या परिसरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस पथकांनी सविस्तर विचारपूस केली. गुन्हे तपासात मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी प्रमोद दोन संशयितांसोबत वाद झाले असल्याचे तपास पथकाला समजले. त्यानुसार तपास पथकाने ओझर गावातून संशयित जयेश देवराम भंडारे, रावसाहेब उर्फ संदिप मधुकर बनसोडे या दोन संशयितांना ओझर येथून ताब्यात घेतले. 

दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी डिसेंबर 12 रोजी मध्यरात्रीचे सुमारास प्रमोद याच्यावर तलवारीने, चॉपरने डोक्यावर, तोंडावर हातांवर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले असल्याचे उघडकीस आले आहे. यातील मयत प्रमोद निकाळजे व संशयित जयेश भंडारे या दोघांचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होवून संशयित जयेश भंडारे व त्याचा मित्र संदिप बनसोडे या दोघांनी मिळून प्रमोद याच्यावर तलवारीने व चॉपरने वार करून खून केला होता. यातील दोन्ही संशयितांना खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.

सदर खूनाचे गुन्ह्याच्या तपासात अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग अर्जुन भोसले यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  अशोक रहाटे यांच्यासह पथकाने मेहनत करून ओझर शिवारात तळ ठोकुन सदर खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. वरील खूनाचे गुन्हयात उत्कृष्टरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे..

news reels New Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here