मुंबई: तीन दशकांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून अनेक निरपराधांचे जीव घेणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुलानं म्हणजेच दाऊदचा भाचा अली शाहनं त्याच्याबद्दल अनेक महत्त्वाचे दावे केले आहेत.

दाऊद इब्राहिमचा मुक्काम पाकिस्तानात असून तिथल्याच एका पठाण तरुणीशी त्यानं निकाह केला आहे. साठी ओलांडलेल्या दाऊदनं दुसऱ्यादा लग्न केलं आहे. दाऊदची पत्नी महजबीननं भाचा अली शाहसमोर हा गौप्यस्फोट केला. दाऊदची पहिली पत्नी महजबीननं केलेल्या दाव्यानुसार ६७ वर्षांच्या दाऊदनं पाकिस्तानात एका पठाण तरुणीशी दुसऱ्यांदा निकाह केला आहे.
आळस दिला अन् जीव गेला; बॉडीबिल्डरची चटका लावणारी एक्झिट; मित्रांच्या डोळ्यांदेखत मृत्यू
दाऊद इब्राहिमचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली शाहनं हा खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत अली शाहनं ही माहिती दिली. दाऊदनं पहिली पत्नी महजबीनला तलाक दिल्याची चर्चा खोटी आहे. त्यात तथ्य नाही, असं अली शाहनं सांगितलं. दाऊदनं पठाण तरुणीसोबत दुसरा संसार थाटल्याची माहिती शाहनं दिली.

दाऊदची पहिली पत्नी महजबीन जुलै २०२२ मध्ये दुबईत भेटली होती. दाऊदच्या दुसऱ्या निकाहाची माहिती तिनंच अली शाहला दिली. महजबीन भारतातील दाऊदच्या नातेवाईकांशी महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्स ऍप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधते. महजबीनला तलाक दिल्याचं दाऊद दाखवतो. मात्र त्यात तथ्य नाही.
पिटबुलच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी; कुटुंबानं कुत्र्याला पकडून पकडून मारलं; निर्घृणपणे संपवलं
दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गेल्या काही दिवसांत मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. अनेकांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी एनआयएनं आरोपपत्रदेखील दाखल केलं आहे. दाऊदनं पाकिस्तानातील त्याच्या मुक्कामाचं ठिकाण बदललं आहे. दाऊद सध्या कराचीतील सुरक्षा दलांच्या परिसराजवळ असलेल्या अब्दुल्ला गाझी दर्ग्याच्या मागच्या बाजूला रहीम फाकीजवळ राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here