हेही वाचा –टेकऑफनंतर २० मिनिटांनी कॉकपिटमध्ये स्फोट, काच फुटली, पायलट हवेत लटकला अन् मग…
जर्मनीच्या बवेरिया येथे ही विहीर सापडली आहे. ही विहीर कांस्य युगातील आहे आणि ती पूर्णपणे लाकडाने बनलेली आहे. याला इच्छा पूर्ण करणारी विहीर मानलं जात होतं. या विहिरीतून १०० पेक्षा जास्त प्राचीन कलाकृती बाहेर आल्या. या सर्व कलाकृती अत्यंत महाग आणि दुर्मिळ आहेत. यावर आता शोध सुरु झाला आहे.

हेही वाचा –चेहऱ्यावर मुखवटा, हातात हातोडा; ३८ सेकंदात तब्बल १६ कोटींची लूट…
यामध्ये ७० पेक्षा जास्त मातीची भांडी, अनेक सजावटीच्या वाट्या, कप आणि भांडी यांचा समावेश आहे. या रोजच्या वापरातील नव्हत्या. तर त्या राजेशाही किंवा खास कार्यक्रमात वापरल्या जायच्या. यासोबतच कांस्याची कपड्याची पिन, एक ब्रेसलेट, चार अंबर मणी, दोन धातूचे सर्पिल, प्राण्यांचे दात आणि एक लाकडी स्कूप देखील सापडला आहे.
या विहिरीच्या लाकडी भिंती जमिनीवर पूर्णपणे संरक्षित आहेत आणि ग्राऊंड वॉटरमुळे त्या भिंती नाममात्र ओल्या आहेत. त्यामुळेच त्याच्या आत सापडलेल्या कलाकृती सुरक्षित आहेत. सध्या यावर संशोधन सुरु आहे.
हेही वाचा –खतरनाक! पत्नीने पर्स उघडली अन् पती कोट्यधीश झाला; इतके पैसे मिळाले की आता थेट निवृत्ती घेणार