Nagpur Crime News : नागपूरसह विदर्भातील शेकडो उमेदवारांची नोकरी मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक करणारा महाठग राकेश खुराणा फसवणुकीत अजूनही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे शंभरहून अधिक उमेदवारांची नवी यादी मिळाली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतरही तो सक्रिय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मागील अकरा वर्षांपासून खुराणा नोकरीच्या नावावर फसवणुकीच्या धंद्यात सक्रिय आहे. तो आजही सांगतो की वेकोलीमध्ये त्याचे अनेकांशी संपर्क आहेत. त्यांच्या माध्यमातून तो उमेदवारांना नोकरी लावून देऊ शकतो. मात्र वास्तवात त्याने आजपर्यंत कोणालाही नोकरी लावून दिली नाही. न्यायालयाने खुराणाची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती.

मोठ्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी

पोलिसांनी (Nagpur Police) खुराणाच्या घराची झडती घेतली. या दरम्यान मोठ्या संख्येत कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांतील एक कागद वेकोलीच्या निवड यादीचाही होता. त्यात 100 हून अधिक उमेदवारांची नावे आहेत, ज्यांची निवड झाल्याचं खुराणाने सांगितलं होतं. त्या यादीवर केंद्रीय आणि विभागीय स्तराच्या अधिकाऱ्यांची केवळ स्वाक्षरीच नाहीतर शिक्काही लावलेला होता. ही यादी पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातून जामीन रद्द झाल्यानंतर खुराणाने हे कागदपत्र तयार केले होते. याचा खुलासा त्यावर असलेल्या तारखेवरून झाला. या संबंधात तपास अधिकारी राजेंद्र निकम यांना विचारले असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. आताच याबाबत काही सांगता येऊ शकत नाही.

news reels New Reels

दोघांचा जणांचा गेला आहे जीव

खुराणा आणि त्याच्या टोळीने अनेकांना जाळ्यात अडकवून फसवणूक केली आहे. त्यांच्या फसवणुकीला बळी पडलेले महावितरणचे सहायक अभियंता मोहन गजभे आणि अमित कोवे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये खुराणा आणि इतरांच्या नावाचा उल्लेखही केला. एक प्रकरण वरुड आणि दुसरे धंतोली ठाण्यात नोंदवण्यात आले. मात्र ही दोन्ही प्रकरणे पोलिसांनी गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे दोन्ही प्रकरणात खुराणाला अटक होऊ शकली नाही. धंतोली ठाण्यात नोंद प्रकरणामध्ये खुराणाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. पोलिसांनी ठरवले तर ते त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या सुसाईड नोटमध्ये खुराणासह इतरांचीही नावे होती. या नावांमध्ये दक्षिण नागपूरचा चर्चित गुंडाचाही समावेश आहे. त्यानंतरही कोणालाही अटक होऊ नये आश्चर्यकारकच आहे.

ही बातमी देखील वाचा…

क्रिकेटचा स्कोअर विचारल्याने संताप, शिवीगाळ केल्याने वाद वाढला, दोन तरुणांवर वार; नागपुरातील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here