Pune Famuse Street food :   आपण जेव्हा आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात जातो तेव्हा आपले सर्व लक्ष तिथल्या खाद्यसंस्कृतीकडे जाते. खाण्याच्या बाबतीत प्रत्येक शहराची (Pune) स्वतःची खासियत असते. विशेषतः स्थानिक स्ट्रीट फूड सर्वांना भुरळ पाडते. रस्त्यावरील (Street Food) खाद्यसंस्कृतीसाठी पुणे शहरही देशभर प्रसिद्ध आहे.पुण्यात तुम्हाला अशी अनेक उत्तम ठिकाणे मिळतील जिथे स्वस्त दरात चविष्ट स्थानिक खाद्यपदार्थ मिळतात. या स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थांची चव तुम्हाला देशात इतरत्र कुठेही मिळणार नाही. तुम्हीही पुण्यात असाल तर या चार पदार्थांची उत्कृष्ट चव चाखायला विसरू नका…

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा पाव हे पुण्यातील प्रसिद्ध देसी स्ट्रीट फूड आहे. पुण्याच्या प्रत्येक चौक-चौकात तुम्हाला हे सकाळी नाश्ता म्हणून खायला मिळेल. साबुदाणा, बटाटे, धणे शेंगदाणे आणि मिरची यांचे मिश्रण करून ही तळलेली वडे तयार केले जातात. हे वडे  बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट आहे. हे पदार्थ चहासोबत खूप चवदार लागतात. पुणेकर हे सहसा पुदिना आणि खजूर चटणीसोबत खातात. जंगली महाराज रोडवरील स्वराज्यचा साबुदाना वडा सगळ्यात प्रसिद्ध आहे. 

पुणेरी मिसळ पाव

पुणे आणि मिसळ यांचं समीकरणच वेगळं आहे. पुणेरी मिसळ पाव हे पुण्याचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. ही मसालेदार मिसळ चिरलेले कांदे आणि लिंबू बरोबर सजवून दिली जाते. ज्यांना मसालेदार किंवा मसालेदार पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी ही मिसळ ही आवडीचा पदार्थ आहे. काटाकीर्र मिसळ आण बेडेकर मिसळ पुण्यातील दोन प्रसिद्ध मिसळ आहे.

दाबेली

दाबेली ही अनेक प्रकारचे मसाले मिसळून बनवली जाते. या डिशचे मूळ गुजरातमधील कच्छचे असल्याचे मानले जात असले, तरी पुण्यातही ते वेगळ्या चवीने प्रसिद्ध आहे. दाबेली द्राक्षे, डाळिंब, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे आणि कुरकुरीत शेव आणि भरलेल्या बटाट्याने बनविली जाते. ब्रेडचा पटकन खाता येणारा आणि खिशाला परवडणारा हा पदार्थ आहे. 

news reels New Reels

बाकरवडी

पुण्यात आलेला प्रत्येक पर्यटक असो किंवा पुणेकर असो. रोज बाकरवडीवर ताव मारण्यासाठी तयार असतात. पुण्यात चितळेंही बाकरवडी सगळ्यात प्रसिद्ध आहे. यात विविध प्रकारचे मसाले भरले जातात. नंतर ते रोल करून तळलेले असते. बाकरवडी खारट आणि गोड अशा दोन्ही प्रकारे बनवली जाते. त्यामुळे अस्सल खवय्ये असलेले पुणेकर तर या बाकरवडीवर कायमत ताव मारताना दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here