नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात पक्षाने कुणाला पाठिंबा द्यायचा याचा अधिकृत निर्णय होण्याच्या आधीच काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांचा प्रचार सुरू केला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी त्यांनी प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक घेतली; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला या बैठकीचे निमंत्रणच नव्हते.

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने शिवसेनेला सोडली होती. शिवसेनेने गंगाधर नाकाडे यांची उमेदवारी जाहीर केली खरी, मात्र अखेरच्या क्षणी त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. नाशिकच्या जागेच्या बदल्यात शिवसेनेने नागपूरची जागा काँग्रेसला दिल्याचे सांगितले गेले. नागपूरसाठी अडबाले यांना समर्थन द्यावे, अशी विनंती स्थानिक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली. त्यांची संमती गृहीत धरून माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अभिजित वंजारी, बबनराव तायवाडे, रवींद्र दरेकर, किशोर गजभिये यांनी मंगळवारी एक बैठक घेतली. आज, बुधवारी अडबाले यांच्या पाठिंब्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नोकरदारांना फटका, ऐन गर्दीवेळी वर्सोवा-घाटकोपर सेवा बंद ठेवणार
राष्ट्रवादी काँग्रेस अनभिज्ञ

सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचे समर्थन असेल, असे सांगितले जाते. मात्र, मंगळवारी वडेट्टीवार यांच्या घरी झालेल्या बैठकीचे ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांना अथवा पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच नव्हते. ‘राष्ट्रवादी’चे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांना पक्षातून बडतर्फ केल्यानंतरही त्यांनी प्रचारास प्रारंभ केला.

मेट्रोसह ‘मुंबई वन’ची सुरुवात, मेट्रोचे ऑनलाईन तिकीट ​​काढण्यासाठी विशेष ॲप

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here