Nashik Trimbakeshwar News: सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, धन्य धन्य निवृत्ती देवा… समाधी त्र्यंबक शिखरी…. मागे शोभे ब्रह्मगिरी…असा महिमा वर्णावा किती’ मोठ्या भक्तीभावात आज त्र्यंबक नगरी (Trimbakeshwar News) नाहून निघाली. यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा (Saint Nivruttinath Maharaj Yatra) महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सपत्नीक केली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurngabad District) वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. 

दोन वर्षे कोरोनाच्या व्यत्ययानंतर यंदा मोठ्या उत्साहात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव साजरा होत आहे. आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी  नतमस्तक झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी दुमदुमलेला परिसर आज भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलून गेला होता. गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे. 

नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात व गोदातिरी मोठ्या भक्तीभावात ही यात्रा संपन्न होत आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मोठी गर्दी ही त्र्यंबकेश्वर नगरीत पाहायला मिळत असून दर्शन बारीत लांबच लांब रांगा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लागल्या आहेत. त्याचबरोबर आज पहाटेपासूनच वारीत वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह कुशावर्तात स्नानासाठी भाविक गर्दी करीत असून केवळ डुबकी मारुन पवित्र होण्यासाठी भाविक विशेषकरुन महिलावर्गाचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे.

निर्मल दिंडी पुरस्कार

यंदा निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. जवळपास पाचशेहून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होत असून या पार्श्वभूमीवर निर्मलवारी करण्याचा निश्चय आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्यासाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आपण थांबत असलेल्या ठिकाणी योग्य स्वच्छतेचे नियोजन केल्यास निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे दिंडी उपयोगी साहित्य देण्यात येणार असून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. 

news reels New Reels

ऑनलाईन दर्शन सुविधा … 

दरम्यान ज्या वारकऱ्यांना दिंडीत येणं शक्य होणार नाही त्या भाविकांसह इतर राज्यातील भाविक भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जवळपास त्र्यंबक प्रशासनाकडून 32 सीसीटीव्ही कॅमेरे आणि देवस्थानकडून दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे तैनात ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिर परिसरात, मंदिराच्या आतील बाजूस मंदिर प्रशासन, बाहेरील बाजूस स्थानिक प्रशासनाकडून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनाऊसिंग व्यवस्था उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याबाबतची माहिती त्र्यंबक पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here