अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे सत्यजित तांबे यांना वडिलांप्रमाणेच निलंबित करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मात्र, त्यावर पक्षाचा अंतिम निर्णय व्हायचा आहे. अशा परिस्थितीत सत्यजित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटविला आहे. त्यामुळे ते स्वत: पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी सत्यजित यांनी अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेसने डॉ. तांबे यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. सत्यजित यांनाही निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंबंधीचा आदेश अद्याप आलेला नाही. असे असताना आता सत्यजित तांबे यांनीच आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटचे प्रोफाइल बदलले आहे. तेथून त्यांनी काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे ते स्वत: काँग्रेस सोडणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांनी हा बदल करताना भाजपशी संबंधित कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नोकरदारांना फटका, ऐन गर्दीवेळी वर्सोवा-घाटकोपर सेवा बंद ठेवणार
‘वारसाने संधी मिळते परंतु……’

तांबे यांनी प्रोफाइलमध्ये बदल करताना ‘वारसाने संधी मिळते; परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं’, हे वाक्य लिहिले असून, ते सूचक मानले जात आहे. तांबे यांना राजकीय वारशामुळे त्यांना संधी मिळत असल्याचे बोलले जात होते. अशा परिस्थितीत घरातील वारशाने आलेली संधी सोडून आपल्या हिमतीवर कर्तृत्व सिद्ध करायला आपण निघालो आहोत, असाच संदेश जणून तांबे प्रोफाइलवरील वाक्यातून देऊ इच्छित असावेत. त्यामुळे आपल्यावरील घराणेशाहीचा शिक्का पुसण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये नागपुरातही गोंधळ, अधिकृत निर्णयाआधीच सुरू केला प्रचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here