पुणे : पुण्यात मंगळवार पेठे येथे जुन्या बाजारात आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की, यामध्ये बाजार पेठेतील ६ ते ७ दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाला याची माहिती सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मिळाली. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये स्थानिक दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पुण्यातल्या मंगळवार पेठ जुना बाजार या ठिकाणी दाट वस्तीमध्ये चार ते पाच दुकानांना सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अचानक धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले. त्यानंतर काही वेळातच आगीचे भीषण रूप दिसू लागले. या घटनेमुळे स्थानिक लोकांची चांगलीच तारांबळ उडाली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले.

विमान हवेत झेपावणार तितक्यात भाजप खासदाराने दार उघडलं; अधिकाऱ्यांची धावाधाव, प्रवाशांना मनस्ताप

परंतु दाट वस्ती असल्यामुळे जवानांना यावेळी चांगलीच कसरत करावी लागली. मात्र, आपलं कौशल्य दाखवत जवानांनी लागलेली आग एका तासातच आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाहीये.

‘शिवसेने’बाबत नवी तारीख, निवडणूक आयोग करणार शुक्रवारी सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here