मोबीन खान, शिर्डी: काँग्रेसने तिकीट न दिल्याने अगोदर मामा बाळासाहेब थोरात नंतर वडील सुधीर तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवून आपली योग्यता सिद्ध केली होती. आता सत्यजित तांबेही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे भाजप आणि आघाडीच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. बुधवारी काँग्रेस पक्षाची बैठक असून यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सत्यजित तांबेंना (Satyajeet Tambe) पाठिंबा जाहीर करतात की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सत्यजित यांनी अपक्ष निवडणूक लढवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. मामा बाळासाहेब थोरात आणि वडील डॉ. सुधीर तांबे यांच्या पावलावर पाऊल टाकत सत्यजित तांबे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहे.

सन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांचे वडील जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांना आमदारकीचे तिकीट काँग्रेस पक्षाने नाकारल्याने त्यांनी काँग्रेस पक्षविरोधी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागली आणि आजवर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आठ वेळा निवडून आले आहेत.
Satyajeet Tambe: नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग; सत्यजीत तांबेंचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील ‘ओळख’ बदलली
तोच प्रसंग पुन्हा बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आणि सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे यांच्या बाबतीतही घडला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने २००९ साली सुधीर तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणी ते विजयी झाले.त्यानंतरच्या दोन निवडणूका त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढल्या आणी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.

आता पुन्हा तीच वेळ बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यावर आली आहे. गेल्या २२ वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सत्यजित तांबेंना उपेक्षाच वाट्याला आलीय. आपल्या मुलाच्या राजकीय भविष्यासाठी आमदार सुधीर तांबे यांनी बंड करत सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क, मनमिळाऊ व्यक्तीमत्व यामुळे कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय मुलगा सत्यजित तांबे हा अपक्ष आमदार होऊ शकतो, असा विश्वास सुधीर तांबेनी व्यक्त केलाय.
सत्यजीत तांबेंच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत कोण-कोण मैदानात? आज चित्र स्पष्ट होणार
नाशिक पदवीधर मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिल्यास सुधीर तांबे सर्वात सरस ठरताना दिसत आहेत. सत्यजित तांबे यांना आघाडी आणि भाजपनेही पाठिंबा दिला नाही तरीही सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक लढवून विजयी होऊ शकतात, असा अंदाज अहमदनगरमधील राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.

पदवीधर मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदार

अहमदनगर _ 1 लाख 16 हजार 319
नाशिक_ 66 हजार 709
जळगाव_ 33 हजार 544
धुळे_ 22 हजार 593
नंदूरबार_ 19 हजार 186
एकुण मतदार_ 2 लाख 58 हजार 391

सुधीर तांबेनी केलेली मतदार नोंदणी- 1 लाख 50 हजार
राजेंद्र विखेंनी केलेली मतदार नोंदणी- 41 हजार
भाजपा- 30 हजार
शुभांगी पाटील- 10 हजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here