Aurangabad Politics : दोन्ही शिवसेनेमध्ये (Shiv Sena) अधिकृतता कोणाला मिळेल याबद्दल काल मंगळवारी राज्यभरात चर्चा सुरु होती. परंतु या धामधुमीत एक महत्त्वाचा प्रवेश काल उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पार पडला. औरंगाबादचे (Aurangabad) माध्यम तज्ञ रेडिओ जॉकी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक शेषराव पवार (Deepak Pawar) यांनी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी स्वतः उद्धव ठाकरे, सुनील प्रभू, राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक चर्चेत आला. कारण याच औरंगाबादमधील पाच आमदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून औरंगाबादच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गटात सतत धुसपूस पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सोबतच नवीन तरुणांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी पक्षातील नेतेमंडळी प्रयत्न करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता ठाकरे गटाकडून असाच एक नवीन पक्षप्रवेश करण्यात आला आहे. औरंगाबादचे माध्यम तज्ञ रेडिओ जॉकी आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक शेषराव पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
रांगड्या पद्धतीने काम करणारी शिवसेना विशेषतः मराठवाड्यातून अशा एका आश्वासक चेहऱ्याला पुढे करते आहे. यामागे खरे गणित काय आहे हे येत्या काळातच ठरू शकेल. कारण युवकांमध्ये असलेली प्रतिमा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेला वावर हा दीपक पवारांचा विशेष हातखंडा आहे. प्रभावी वक्तृत्व आणि आक्रमक भाषाशैली साठी ते प्रसिद्ध आहेत. तसेच माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव हा सुद्धा पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाकडून देखील जिल्हाप्रमुखांची नियुक्ती…
ठाकरे गटाकडून नवीन पक्षप्रवेश केले जात असतानाच, शिंदे गटाकडून देखील पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान शिंदे गटाकडून देखील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात युवा सेनच्या जिल्हाप्रमुखपदी शेखर अप्पासाहेब जाधव, सचिन देवीदास मिसाळ आणि काकासाहेब बाबासाहेब टेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जिल्हाप्रमुख यांचे कार्यक्षेत्र वेगळे असणार आहे.
New Reels
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी…
आगामी महानगरपालिका, नगरपालिका,नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तर औरंगाबादमध्ये देखील शिंदे आणि ठाकरे गटाकडून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. दोन्ही पक्षाचे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम करतांना पाहायला मिळत आहे. तसेच दोन्ही पक्षाकडून पक्षप्रवेशाचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहे. विशेष म्हणजे पक्षातील तरुणांना अधिक संधी देण्याचं प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात देखील या दोन्ही पक्षात आणखी काही नवीन आणि मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी:
Aurangabad: ठाकरे गटाविरोधात शिंदे गटाने दंड थोपटले; युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी तिघांची नियुक्ती
Thank you very much for sharing such a useful article. Will definitely saved and revisit your site
OKBet