Authored by सरफराज सनदी | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jan 2023, 2:14 pm

Sangli local news | सांगलीत मकरसंक्रांतीच्या दिवशी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुलावर मुंबईत उपचार सुरु होते. तर आईवर सांगलीत उपचार सुरु होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास शहाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मुंबईमध्ये उपचार घेणारे शहाजी पाटील यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Sangli Mother Son died
आई मुलाचा दुर्दैवी मृत्यू

हायलाइट्स:

  • आधी आईचा मृत्यू आणि दोन तासानंतर मुलाचाही मृत्यू
  • मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त, आई चिंतातूर
सांगली: दुर्धर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीच्या चिंतेने आईची प्रकृती बिघडली,मग बघता बघता आईने प्राण सोडले, त्यानंतर अवघ्या दोन तासातच मुंबईत उपचार घेणाऱ्या मुलाने देखील आपले प्राण सोडले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी या ठिकाणी घडली आहे.

कारंदवाडी गावातल्या कृष्णानगर (हाळ) या ठिकाणी राहणाऱ्या शहाबाई विलास पाटील (वय ६२) आणि शहाजी विलास पाटील(वय ४३) या दोघांना माय -लेकाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संक्रातीच्या दिवशीच अवघ्या दोन तासाच्या अंतरामध्ये आई आणि मुलाचा मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Pune Accident: शाळेतून घरी येताना आजोबा-नातवाला स्पोर्टस् बाईकची धडक, दोघांचाही दुर्दैवी मृत्यू
शहाबाई विलास पाटील यांचा मुलगा शहाजी हा गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजारामुळे ग्रस्त होता. त्याच्यावर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा उपचार करण्यात आले,त्यानंतर मुंबई या ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, मुलाची प्रकृती ही दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे त्यांच्या आई शहाबाई चिंताग्रस्त बनल्या होत्या. यातून शहाबाई यांची प्रकृती देखील बिघडत होती. मुलाचा आजार बरा होत नव्हता. ही चिंता शहाबाई यांना भेडसावत होती. या ताणामुळे शहाबाई यांची प्रकृती अखेर बिघडली,त्यामुळे मकर संक्रांतीच्या दोन दिवस आधी त्यांना उपचारासाठी सांगलीच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या.
रस्त्यावरून जाताना अचानक ब्लास्टिंग; आईचा जागीच मृत्यू, तर मुलाने रुग्णालयात सोडले प्राण
एका बाजूला मुंबईमध्ये मुलावर उपचार सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला आता मुलाच्या आजाराच्या चिंतेमुळे आई देखील आजारी पडली होती. मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास शहाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पाटील कुटुंबीय व्यथित झाले होते. या घटनेमधून पाटील कुटुंबीय अजून सावरायचं देखील होते. तोपर्यंतच या कुटुंबांवर आणखी एक डोंगर कोसळला. तो म्हणजे मुंबईमध्ये उपचार घेणारे शहाजी पाटील यांचाही मृत्यू झाला. दोन तासांपूर्वी आईचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मुलाचा देखील मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे पाटील कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कारंदवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here