मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबई अनलॉक करण्याबरोरबच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असं चहल यांनी सांगितलं.

गेल्या दोन महिन्यात मुंबईत दर दिवशी सरासरी १७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुंबई अनलॉक करू शकतो. मात्र मुंबईशेजारील एमएमआर क्षेत्रात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ते प्रमाण कमी झालं पाहिजे, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले. मुंबईचा रुग्णवाढीचा दर हा केवळ एक टक्का आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यास रुग्णवाढीचा दर ६४ दिवसांवर येईल. त्यामुळे आपण लोकल ट्रेनही सुरू करू शकतो, असं चहल म्हणाले.

मुंबईत रेल्वे सुरू झाली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मुंबईची लोकसंख्या २० मिलियन आहे. त्यामुळे शहरात किमान २०० हॉस्पिटल आणि बेड्सची दिवसाला गरज आहे. पूर्वी पेक्षा मुंबईची स्थिती आता खूप चांगली आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या दोन कोटी आहे. त्यामुळे एकदा का लोकल सुरू केली तर रेल्वेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कल्याण आणि नालासोपाऱ्याहून मोठ्या प्रमाणावर लोक येतील. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व काही सुरू करण्याची विनंती करेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात करोनामुळे काल आणखी २५७ रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता १३ हजार ३८९ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६५ इतका मृत्यूदर आहे. राज्यात काल दिवसभरात ९२५१ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांना राज्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी दिलासा देणारी बाब म्हणजे आज ७२२७ रुग्ण करोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९२० जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ३ लाख ६६ हजार ३६८ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here