Nashik Satyajeet Tambe : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात महत्वाची घडामोड घडली असून शिक्षक भारती संघटनेने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा कपिल पाटील यांनी नुकतीच शिक्षक भारती व जनता युनायटेड दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे.  नाशिकमध्ये (Nashik Padvidhar Election) आज सत्यजित तांबे यांनी मतदारांच्या घरोघरी जात भेटी घेतल्या. त्यानंतर सायंकाळी शिक्षक भारती आणि जनता युनायटेड दलाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कपिल पाटील (kapil Patil) यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर असल्याचे सांगितले आहे.  दरम्यान आजच महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी तांबे यांना दिले आहे. त्यामुळे आता सत्यजीत तांबे यांना पाठिंबा मिळत असून हळूहळू या निवडणुकीत रंगत अधिकच वाढत जाणार आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणार्‍या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे मैदानात आहेत. मात्र सुरवातीपासूनच सत्यजीत तांबे यांना कोण पाठिंबा देणार किंवा भाजप शेवटी खेळी करणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज सत्यजीत तांबे हे नाशिकमध्ये येऊन त्यांनी मतदारांकडे भेटीगाठी होत आहेत. शिवाय महत्वाच्या शिक्षक संघटनाकडे पाठिंबा देखील मिळवण्याचा प्रयत्न आहे. यातच तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा दिला असल्याचे समजते आहे. या संघटनेचे राज्यभरात शेकडो सदस्य असून जाहीर पाठिंबा देणारी पहिलीच संघटना असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये आज झालेल्या शिक्षक भारती व जनता युनायटेड दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना पाठिंबा मिळाला आहे. याबाबतची घोषणा देखील कपिल पाटील यांनी केली आहे. 

शिक्षक भारती संघटनेचा पाठिंबा
शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना म्हणजे शिक्षक भारती संघटना होय. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात ही संघटना कार्यरत असून या माध्यमातून अनेक शैक्षणिक प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न असतील. ते सोडविण्याचे काम या संघटनेने केले आहे. दरम्यान विधान परिषदेची नाशिक पदवीधर निवडणूक चुरशीची होत असून यासाठी पहिल्यांदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर डॉ. सुधीर तांबेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आज सत्यजित तांबे यांना शिक्षक भारती संघटनेने पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. 

news reels New Reels

महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सर्व पदवीधर मतदारांनी सत्यजित तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन ‘मस्ट’ या संघटनेने केले आहे. पदवीधरांना उच्चशिक्षित असलेल्या सत्यजित तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे, असे मनीष गावंडे यांनी पत्रात म्हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here