Pune Koyta Gang : कोयता गँगच्या (koyta gang) तरुणांची हलगी वाजवत धिंड काढण्यात आली. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची रस्त्यावर पोलिसांनी (Pune Police News) वरात काढली. त्यांची ही धिंड पाहून अनेक व्यापाऱ्यांना आनंद झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी घातक शस्त्र जमा करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. हा सगळा प्रकार पुण्यातील कोंढवा भागात घडला. त्या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून ज्या ठिकाणी या आरोपींनी दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. अनवाणी पायाने पोलिसांनी त्यांना संपूर्ण परिसरातून फिरवले. दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. अनेक परिसात या गॅंगने धुमाकूळ घातला अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड करत नुकसान केलं. त्यामुळे या दोन्ही आरोपींची धिंड पाहून व्यापाऱ्यांना आनंद झाला आहे.

शहरात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नव्या परिसरात दहशत निर्माण करत आहेत. अनेकांवर कोयत्याने वारदेखील केले जात आहेत. कालच (17 जानेवारी) पुण्यात कोयता गँगने हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्या (Pune crime) होत्या. पहिल्या घटनेत पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाला गंभीर जखमी केलं आहे. तर लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले होते. या दोन्ही घटनेत दोन जण जखमी झाले होते.  

कोयता गॅंग विरोधात कॉम्बिंग ऑपरेशन

कोयता गॅंगविरोधात पुण्यात कॉंम्बिंग ऑपरेशन राबण्यात येत आहे. रोज अनेक परिसरात पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 700 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली त्यातील अनेक आरोपींना अटक केली. कोयता गॅंगचा म्होरक्या असलेला बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. मात्र अजूनही कोयता गॅंगमधील अनेक गुन्हेगार पुण्याच्या रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. त्यांच्यावर योग्या कारवाई करुन त्यांना जेरबंद करणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 

news reels New Reels

संबंधित बातमी-

Pune Koyta Gang : कोयता गँगचा हैदोस! झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार; डोक्याला गंभीर दुखापत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here