Live अपडेट्स…
>> सूरिनाम (आफ्रिका खंड) देशाचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांना दिल्या शुभेच्छा.. आपल्या पदाची शपथ घेताना चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी वेदमंत्रांनी घेतली शपथ- मोदी
>> तामिळनाडूतील नमक्कल येथील कनिका या विद्यार्थिनीशीही साधला मोदी यांनी संवाद.
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील उस्मान या विद्यार्थ्याशी साधला संवाद.
>> केरळमधील एर्नाकुलम येथील विनायक या विद्यार्थ्याशी साधला संवादय
>> परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या पानीपतमधील कृतिका या विद्यार्थिनीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद.
>> आता देश बदलत आहे, छोटया गावांमधूनही तरुण पुढे येत आहेत. हे तरुण नाविण्यपूर्ण कामे करत आहेत- मोदी
>> देशात हातमागाची कामे देखील उत्तम होत आहेत- मोदी
>> लडाखमध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन केले जात आहे…. या शेतीमध्ये लडाखची अर्थव्यवस्था बदलण्याची शक्ती आहे-मोदी
>> लेह आणि लडाख तसेच कच्छ या दोन भागांमधील आर्थिक प्रगतीबाबत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले विचार
>> पंतप्रधान मोदी यांनी देशात होत असलेल्या नाविण्यपूर्ण पावलांवर केले भाष्य… ईशान्यकडील राज्यात बांबूपासून पाणी पिण्याचे ग्लास तयार केले जात आहेत- मोदी
>> करोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टीही पुढे आल्या आहेत- मोदी
>> करोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता- मोदी
>> कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे- पंतप्रधान मोदी
>> देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा हा महात्मा गांधी यांचा अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेला विचार पंतप्रधानांनी आज बोलून दाखवला.
>> कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण
>> विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो- मोदी
>> कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता- मोदी
>> पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता- मोदी
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर जवानांचे स्मरण
>> त्याच प्रमाणे २८ जूनच्या मन की बातमध्ये मोदींनी करोनाचे संकट आणि भारत-चीन तणावावर भाष्य केले होते.
>> ३१ मे रोजी झालेल्या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या.
>> ‘मन की बात’ च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता.
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे काही वेळातच जनतेशी संवाद साधत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.