प्योंगपांग: जगभरात करोनाचा थैमान सुरू असताना काही देशांनी एकही करोनाबाधित नसल्याचा दावा केला होता. ‘पोलादी’ भिंतीआड असलेल्या उत्तर कोरियाकडूनही असाच दावा करण्यात येत होता. आता मात्र, पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर कोरियात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यानंतर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी सीमेलगतच्या केसोंग भागात लॉकडाउन जाहीर केला आहे. संशयित करोनाबाधित रुग्ण हा अवैधपणे सीमा ओलांडून आला असल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती तीन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात गेली होती. त्यानंतर अवैधपणे सीमा ओलांडून पुन्हा एकदा उत्तर कोरियात प्रवेश केला असल्याचे वृत्त उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

वाचा:

वाचा:

या करोनाबाधिताला अधिकृतपणे बाधित जाहीर करण्यात आले नसल्याचे समजते. या रुग्णाला करोनाबाधित असल्याचे जाहीर केल्यास तो उत्तर कोरियातील पहिला रुग्ण ठरणार आहे. या रुग्णाची करोना चाचणी झाली की नाही याबाबतची माहिती स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिली नाही. मात्र, त्याच्यात करोनाची लक्षणे आढळून आली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, केसोंग शहरात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे उत्तर कोरियात करोनाबाधित आढळला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

वाचा:

रशियाने उत्तर कोरियाला काही दिवसांपूर्वीच हजारो करोना चाचणी किट्स पाठवले आहेत. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आधीपासूनच नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहे. उत्तर कोरियाच्या सीमेतून कोणीही अवैधरीत्या प्रवेश करू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना लष्कराला देण्यात आल्या आहेत.

वाचा:

दरम्यान, उत्तर कोरियाने एकही करोनाबाधित नसल्याचा सातत्याने दावा केला होता. मात्र, करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, मास्क घालणे आणि सीमा भागात काम करत असलेल्यांचे विलगीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उत्तर कोरियामध्ये एकही करोनाबाधित आढळला नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. सरकारी पातळीवरही योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे समोर आले होते. सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीतही सोशल डिस्टेसिंगचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी किम यांच्यासोबत उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये अंतर दिसले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here