Accident on Mumbai goa highway | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. रायगडच्या माणगावनजीक अपघात. ९ जण जागीच ठार, पहाटे पाच वाजता अपघात, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत.

 

Accident in raigad
रायगडमध्ये भीषण अपघात

हायलाइट्स:

  • मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
  • रायगडच्या माणगावनजीक कार-ट्रकची टक्कर
रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक गुरुवारी पहाटे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, माणगावच्या रेपोली गावाजवळ असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे या कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here