कल्याण/ठाणे: पाटणा एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या प्रसंगावधानतेमुळं मध्य रेल्वेवरील खडवली-टिटवाळादरम्यान मोठा रेल्वे अपघात टळला. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं लोकोपायलटच्या लक्षात आलं. त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झालेली वाहतूक अर्ध्या तासानं पूर्ववत करण्यात आली.

कल्याणजवळ खडवली-टिटवाळा दरम्यान अप दिशेकडील रेल्वे रुळाला तडा गेल्यानं आज सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर रेल्वे प्रशासनानं दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेला दिलासा

कांजूर, नवी मुंबई, ठाणे का वगळले?

जखमींच्या मदतीसाठी १५० रेल्वे हमाल

अन्यथा मोठा अनर्थ घडला असता…

सकाळी साडेनऊच्या सुमारास पाटणा एक्स्प्रेस खडवली-टिटवाळा दरम्यान पोहोचली असता, अप दिशेकडील रेल्वे रुळाला तडा गेल्याचं लोकोपायलट एस. मुरुगन यांच्या लक्षात आलं. त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली. तसंच रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यांनी ब्रेक दाबला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. लोकोपायलट मुरुगन यांच्या प्रसंगावधानतेमुळं मोठा संभाव्य रेल्वे अपघात टळला. दरम्यान, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासानंतर दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. रेल्वेतर्फे लोकोपायलट एस. मुरुगन यांना योग्य ते बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here