मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मुद्द्यावर वाद सुरू आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. रहमानच्या मते, बॉलिवूडमध्ये असा एक टगट आहे जो त्याच्याविरोधात काम करत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याला काम मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रहमान यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रहमानने हा खुलासा केला.

बॉलिवूडमध्ये कमीत कमी काम करण्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही लोक त्यांच्याबद्दल सिनेसृष्टीत अफवा पसरवत आहेत. त्यामुळे सिनेनिर्माते आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण होत आहेत. ‘मी चांगल्या सिनेमांना नकार देत नाहीत. पण काही गँग आहेत जे माझ्याविरुद्ध अफवा पसरवत आहेत आणि यामुळे फक्त गैरसमज निर्माण होत आहेत. जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना दोन दिवसांमध्ये चार गाणी दिली. त्यावेळी छाब्रा म्हणाले की, अनेकांनी मला तुमच्याकडे न येण्याबद्दल सांगितलं. यासंबंधीचे अनेक किस्सेही सांगितले.’

रहमान पुढे म्हणाले की, ‘मी ऐकलं आणि ठीक आहे एवढंच म्हणालो. आता मला कळलं की सिनेसृष्टीत मला काम का मिळत नव्हतं आणि माझ्याजवळ चांगले सिनेमे का येत नव्हते. फार कमी लोकांना मला काम करताना पाहायचं आहे तर काही असेही आहेत जे माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.’

ए.आर रहमान शेवटी म्हणाले की, ‘माझ्या नशिबावर फार विश्वास आहे. मला वाटतं जे काही असतं ते देवाची देण असते. याचमुळे मी माझ्या सिनेमांवर आणि इतर गोष्टींवर काम करत आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकडे येऊ शकता. तुम्ही चांगल्या सिनेमांची निर्मिती करत आहात आणि तुमचं मी स्वागतच करेन.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here