पुणे : गेल्या आठवड्यात शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची संख्या साडेबारा लाखांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. ‘पीएमपी’कडे दाखल झालेल्या सर्व ‘ई-बस’ मार्गावर आल्यामुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.पुणे शहरात पीएमपी ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. साधारण १६०० ते १६५० दरम्यान बस मार्गावर धावत होत्या. त्यामधून दिवसाला साधारण १० ते १२ लाख दरम्यान उत्पन्न मिळत होते. मात्र, पीएमपीकडून जास्तीत जास्त बस मार्गावर आणून प्रवाशांना सेवा देण्याच्या सूचना ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबरोबरच कोणत्या मार्गावर गर्दी असते, याचादेखील ‘पीएमपी’ने अभ्यास सुरू केला आहे. जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यापासून ‘पीएमपी’च्या दररोज १,७०० ते १,७५० बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या देखील साडेबारा लाखांपर्यंत वाढली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.४५८ ई-बस मार्गावर‘पीएमपी’च्या ताफ्यात आतापर्यंत ४५८ ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यानुसार भेकराईनगर, डेक्कन, निगडी, वाघोली, बाणेर हे डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. वाघोली येथील ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तेथून १०५ बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता ४५८ ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे एकूण बसची संख्यादेखील वाढली आहे.आकडे काय सांगतात?१६५०पूर्वीची दैनंदिन बसची संख्या१२लाखपूर्वीची दैनंदिन प्रवासी संख्या१७५०गेल्या आठवड्यातील बसची संख्या१२ लाख ५० हजारगेल्या आठवड्यातील प्रवाशांची संख्या