वृत्तसंस्था, संयुक्त राष्ट्र: अफगाणिस्तानमध्ये जवळपास सहा हजार दहशतवादी सक्रीय असल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात करण्यात आला आहे. यातील बहुतांशी दहशतवादी पाकिस्तानमधील ‘तहरीक-ए-तालिबान’ या संघटनेशी संबंधित आहेत. त्याशिवाय भारतीय उपखंडात दहशतवादी हल्ला करणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयसिस, अल-कायदा आणि त्यांच्या संबंधित व्यक्ती, संघटना यांच्याशी निगडीत एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, अल कायदा (एसक्यूआयएस) तालिबानअंतर्गत अफगाणिस्तानमधील निमरूज, हेलमंद आणि कंदाहर प्रांतात सक्रिय आहे. त्याशिवाय बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये अल कायदाचे १५० ते २०० सदस्य आहेत. सध्या या एसक्यूआयएसचा म्होरक्या ओसामा महमूद असून त्याने आसिम उमर याची जागा घेतली आहे. आमिर उमरला ठार करण्यात आल्यानंतर अल कायदा त्याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.

वाचा:

अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘तहरीक-ए-पाकिस्तान’चे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी पाकिस्तानमध्ये मोठे हल्ले करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याशिवाय, जमात-उल-अहरार आणि लष्कर-ए-इस्लामद्वारा करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात तहरीकने मदत केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची अधिक शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी गट सक्रिय असून हे गट तालिबानशी संबंधित आहेत. अफगाणिस्तानमध्ये अल कायदा १२ प्रातांत गुप्तपणे सक्रिय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

अहवालानुसार, अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट मोठे हल्ले करण्यास सक्षम आहेत. यातील बहुतांशी गटांनी अमेरिकेसोबत झालेल्या शातंता कराराला विरोध दर्शवला आहे. एप्रिल महिन्यात मालदीवमध्ये शासकीय कार्यालयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जवाबदारी यातील काही गटांनी घेतली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here