२१ डिसेंबरलाच पतीने घराला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये आत्महत्या केल्याची भीती पत्नीने व्यक्त केली आहे. खरंतर, गावापासून घर खूप लांब असल्यामुळे याचा कोणालाही पत्ता लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पुढील प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये पत्नी आणि मुलांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
crime news today marathi, निघून गेलेली पत्नी २८ दिवसांनी घरी आली, पण तोपर्यंत सगळं संपलं, पतीला पाहिलं अन् हादरलीच… – man hanging from rope for 28 days turns into skeleton in uttar pradesh kanpur news
कानपूर : पती-पत्नीच्या वादातून भयंकर गुन्हे झाल्याच्या अनेक घटना आपण रोज पाहतो. पण याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि मुलं घर सोडून गेल्याने तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तरुणाचा मृतदेह तब्बल २८ दिवस फासावर लटकत होता. बुधवारी पत्नी घरी आली तेव्हा तिने तिला हे सगळं पाहून धक्काच बसला. पतीचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला. इतकंच नाही तर त्याचा सांगाडा झाला होता. तिने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.