वसई : शरीर सुदृढ बनवण्यासाठी व फिट राहण्यासाठी बहुतांश जिमचा पर्याय निवडण्यात येतो. मात्र, जिममध्ये व्यायाम करताना अचानक चक्कर येऊन एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई इथे घडली आहे. प्रल्हाद निकम असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. निकम यांना चक्कर आल्याचे लक्षात येतात जिममधील काही तरुणांनी निकम यांना तात्काळ वसईतील कार्डिनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रल्हाद निकम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. शवविच्छेदनानंतरच निकम यांच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.