Abdul Sattar : बारामतीत भरलेलं कृषी प्रदर्शन (Baramati Agricultural Exhibition) पाहून मी भारावून गेलो असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं. राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अत्यंत उत्तम नियोजन केलं आहे. इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नसल्याचे सत्तार म्हणाले. हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी येऊन पाहायला हवं असेही सत्तार यावेळी म्हणाले. सत्तार यांनी बारामतीत पवारांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळालं.

असे प्रकल्प दुष्काळी भागात राबवले तर शेतकऱ्यांना फायदा

वर्षभरात आपण आपल्या शेतीत नवीन काय प्रयोग करतो किंवा करायला पाहिजे यासंदर्भातील माहिती इथे मिळते. राजेंद्र पवार यांनी बारामतीत शेतीत वेगवेगळे प्रकल्प राबवले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा असल्याचे सत्तार म्हणाले. त्यांच्याकडे अनेक जातीच्या गायी म्हशी आहेत. असे प्रकल्प जर दुष्काळी आत्महत्याग्रस्त भागासाठी राबवले तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असेही सत्तार म्हणाले. आमचा जर त्यांच्याशी करार झाला तर महाराष्ट्रातील आणि विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल. इथे शेतकऱ्यांना जोडधंदा कसा करावी याची माहिते मिळेल. एका शेतकऱ्याला हे प्रदर्शन बघण्यास दोन दिवस लागतील असे सत्तार म्हणाले. राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान कोणीही विसरणार नसल्याचे सत्तार म्हणाले. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी 

हे प्रदर्शन पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी असेही सत्तार म्हणाले. मी सिल्लोडमध्ये भरवलेल्या कृषी प्रदर्शनापेक्षा किती तरी मोठं कृषी प्रदर्शन बारामतीत भरवले आहे. मी पण येथून काहीतरी शिकून जाईल असे सत्तार म्हणाले. 

अजित पवारांनीही केली पाहणी 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. मात्र ते पाहणी अर्धवट सोडून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. अजित पवारांनी 8.15 ते 9.30 असा वेळ दिला होता. परंतु अजित पवार हे 9.45 ला पुढील कार्यक्रमाला उशीर होत असल्याने ते कार्यक्रमास निघून गेले. अब्दुल सत्तार हे 10 वाजून 10 मिनिटांनी कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 3 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. 

news reels New Reels

19 ते 22 शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन खुले

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या ( Agricultural Development Trust, Baramati ) कृषी विज्ञान केंद्र, (KVK) अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरिता वेबीनारचे आयोजन केरण्यात आले होते. कृषिक प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत. 

170 एकरवर कृषिकचे आयोजन 

170 एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agricultural Exhibition : बारामतीत आजपासून कृषी प्रदर्शन, कृषीमंत्री सत्तारांसह अजित पवार देणार भेट  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here