भोपाळ: मध्य प्रदेशच्या बेतूलमध्ये विचित्र घटना घडली आहे. बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकाच वेळी तरुणीच्या घरी पोहोचले. त्यांनी गोंधळ घातला. आपल्या नात्याबद्दल खरं काय ते सांग, असं म्हणत दोघांनी तरुणीसोबत वाद घातला. यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण सुरू केली. यापासून स्वत:ला वाचवण्यापासून तरुणीनं विहिरीत उडी घेतली.

मध्य प्रदेशच्या बेतूल जिल्ह्यातील बोरदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. सुरा, काठ्या घेऊन पाचजण तरुणीच्या घरी पोहोचले. त्यातील दोघांनी तरुणीला शिवीगाळ सुरू केली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. दोघे तरुण तरुणीला मारहाण करू लागले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी तरुणीनं घराबाहेर धाव घेतली आणि विहिरीत उडी मारली.
चिमुकल्यानं नाणं गिळलं, श्वास घेताना त्रास; नाणं काढण्यास अनेक डॉक्टरांचा नकार; अखेर…
तरुणीला विहिरीत उडी घेताना शेजारच्यांनी पाहिलं. त्यांनी तातडीनं तिच्या मदतीसाठी धाव घेतली. तरुणीला विहिरीत बाहेर काढून बोरदेही सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती बिघडल्यानं पुढील उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर आहे.

तरुणीच्या घरात घुसलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडलं. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यांची चौकशी सुरू आहे. तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसोबतचा संवाद थांबला. त्यामुळे तो संतापला होता. तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची भेट झाली. नेमका प्रकार काय याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी दोघांनी तरुणीचं घर गाठलं. त्यावेळी तिघांमध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर गोंधळात झालं.
दिल्लीहून पळून आलेल्या प्रेमी युगुलाचा औरंगाबादेत करुण अंत; समृद्धी महामार्गावर ट्रकनं चिरडलं
तरुणीच्या वडिलांनी दोन्ही तरुणांविरोधात बोरदेही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांसोबत आणखी काही जण तरुणीच्या घरात गेले होते. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here