व्हिक्टोरिया : पती-पत्नीच्या नात्यांमध्ये सगळं काही ट्रान्सपरंट असले पाहिजे. दोघांना एकमेकांविषयी सगळी माहिती असली पाहिजे, असं बोललं जातं. पण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दोघांनाही एकमेकांबद्दल माहिती नसतात. असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात असं काही घडलं की ती गोष्ट आपल्या पत्नी आणि मुलांना सांगूच शकला नाही. तो हे सांगण्यासाठी खूप घाबरत होता. तो रोज घरी यायचा सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण तरीही महत्त्वाची गोष्ट पतीने आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवली.

हा ४६ वर्षीय व्यक्ती, हॉंगकॉंगचा रहिवासी आहे. या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. या गोष्टींने त्याला खूप मोठा धक्का बसला. पण हे तो आपल्या बायकोला आणि मुलांना सांगण्यासाठी घाबरत होता. त्यामुळे तो रोज घरातून कामाच्या वेळी निघायचा आणि संध्याकाळी परत घरी यायचा. असं दाखवायचा की तो नोकरीला जातोय पण प्रत्यक्षात तर त्याची नोकरीच गेली होती.

मुंबई : व्यायाम करताना अचानक चक्कर आली अन्…, जिममध्येच क्षणात संपले आयुष्य
या व्यक्तीने आपली ओळख लपवून ठेवली आहे. अधिक माहितीनुसार, गेल्या वर्षीच त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. पण अनेक महिने तो नोकरीला जात असल्याचं नाटक करत होता. सुरुवातीला नोकरी सोडल्यानंतर त्यांनी तीन आठवड्यांची सुट्टी असल्याचं घरी सांगितलं. मात्र, नंतर नोकरीला जाण्याचं नाटक त्यांनी सुरू केलं. त्यांनी अनेक वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज केले. पण त्यांना कुठेही नोकरी लागली नाही.

या व्यक्तीला याबाबत विचारलं असता, ‘हे सर्व माझ्या बायकोला सांगण्याची हिंमत मी करू शकत नाही. मी सकाळी घरून निघतो आणि संध्याकाळी परत येतो. नोकरीवर असल्याचं घरी भासवणं हे सोपं नाहीये. सध्या माझ्याकडे जी काही बचत आहे त्यावर मी घर चालवतो. पण नोकरी शिवाय हे नाटक फार काळ सुरू ठेवता येणार नाही’ अशी भीतीही या व्यक्तीने बोलून दाखवली.

निघून गेलेली पत्नी २८ दिवसांनी घरी आली, पण तोपर्यंत सगळं संपलं, पतीला पाहिलं अन् हादरलीच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here