कोणत्याही मालिकेच्या सेटवर सर्वाधिक आवाज असतो तो; त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा. दिग्दर्शकाचा शब्द सेटवर अखेरचा असतो. दिग्दर्शक जर तापट आणि शिस्तप्रिय असेल, तर सेटवरचे सगळेच त्याला घाबरून असतात. सध्याचं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे. म्हणजे, दिग्दर्शक सांगेल ते होतंच. पण, प्रत्येक सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय की नाही हे कठोरपणे पाहण्यासाठी ”ची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येकाला त्याचं ऐकावंच लागतं.
लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शूटिंगचं काम करताना एका ठिकाणी अनेक मंडळी एकत्र काम करत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. नव्यानं चित्रीकरण करताना सरकारनं काही नियम घालून दिले आहेत. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच चित्रीकरण केलं जाणं आवश्यक आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. या सर्व नियमांची पूर्तता कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींकडून योग्य तऱ्हेनं होतेय की नाही यावर हा ‘सोशल डिस्टन्सिंग दादा’ बारीक लक्ष ठेवून असतो. सेटवर जर कुणी मास्क न घालता वावरत असेल, किंवा सुरक्षित अंतर न ठेवता एकमेकांशी बोलत असेल, तर लगेचच हा ‘दादा’ येऊन त्या संबंधित कलाकाराला, तंत्रज्ञाला खबरदारी पाळण्याविषयी कडक सूचना देतो. म्हणूनच कलाकारांनी सेटवरच्या या ‘दादा’चं नामकरण ‘सोशल डिस्टंसिंग दादा’ असं केलं आहे.
नियम काय सांगतो?
चित्रीकरणासाठी राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली होती. सरकारकडून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, सेटवर एक व्यक्ती सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होतेय की नाही? यावर लक्ष ठेवेल. त्यासाठी सेटवर एका निरीक्षकाची नियुक्ती केली जाणं आवश्यक आहे. म्हणूनच सध्या हिंदी-मराठी मालिकांचा चित्रीकरणाच्या सेटवर एक सुपरवायजर असतो, जो सेटवरील घडामोडींवर आणि कलाकार, तंत्रज्ञ यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून असतो. बहुतांश वेळा ही व्यक्ती सुरक्षारक्षकांपैकीच कुणीतरी असते.
काय करतो ‘सोशल डिस्टन्सिंग दादा’?
* कलाकार, तंत्रज्ञ सेटवर येण्याअगोदर संपूर्ण सेटचं करून घेणं.
* मेकअप रूम्सचं निर्जंतुकीकरण करून घेणं.
* सेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची, ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवणं.
* सेटवर प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायजर लावून सॅनिटाइज करणे.
* दिवसभर सेटवर वावरुन लक्ष ठेवणं.
* कुणी व्यक्ती मास्क न वापरता सेटवर वावरत असेल, तर त्याला मास्क वापरण्याबाबत सूचना करणं.
* कुणी व्यक्ती सुरक्षित वावराचे नियम वारंवार न पाळताना आढळल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार मालिकेचे निर्माते किंवा कार्यकारी निर्मात्याकडे करणं.
सेटवर सकाळी पहिल्यांदा मी हजेरी लावतो. अगोदर स्वतःला योग्य प्रकारे सॅनिटाइज करून नंतर आमच्या टीमकडून मी संपूर्ण सेटचं निर्जंतुकीकरण करुन घेतो. हळहळू जेव्हा सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी येऊ लागले की त्यांना सॅनिटाइज करणं, त्यांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजन पातळीची तपासणी मी करतो. दिवसभर सेटवर मी इकडे-तिकडे फिरत असतो. सेटवरील प्रत्येकावर माझं लक्ष असतं. कुणी व्यक्ती मास्क न लावता फिरत असेल तर त्याला सूचित करण्याचं काम माझं आहे. सध्या तर मला पाहून सेटवरचे सगळे जण सावध होतात.
– सौरभ नवले, सुरक्षारक्षक ()
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times