पाटणा: पती-पत्नीमध्ये होणारे वाद, त्यांच्यातली भांडणं यात नवं काही नाही. अनेकदा दोघांमधले वाद पोलीस ठाण्यात, न्यायालयात पोहोचतात. बिहारची राजधानी पाटण्यात असाच एक प्रकार घडला आहे. थंडीचा कडाका वाढला असताना पत्नीनं पतीचं स्वेटर धुवायला टाकलं. त्यामुळे पती संतापला. रागाच्या भरात त्यानं संपूर्ण घर पेटवलं. आग लागल्यामुळे एकच खळबळ माजली. नेमका काय प्रकार घडला ते पत्नीला कळण्याआधीच आगीचे लोळ उठू लागले. अवघ्या काही मिनिटांत आग संपूर्ण घरात पसरली.

राजधानी पटणामधील गांधी मैदान परिसरातील पीरमुहानी येथे ही घटना घडली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. पती-पत्नी एका वकिलाच्या घरात भाड्यानं राहतात. महिलेनं पतीचं स्वेटर धुण्यासाठी पाण्यात टाकलं. त्याचवेळी पतीनं तिच्याकडे स्वेटर मागितलं. स्वेटर धुवायला टाकल्याचं तिनं पतीला सांगितलं.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्…
थंडीचा कडाका वाढला असताना पत्नीनं स्वेटर धुवायला टाकल्याचा पतीला राग आला. त्यानं बाकीच्या कपड्यांना आग लावली. पत्नी पतीला समजवण्याआधी, त्याचा राग शांत करण्यापूर्वी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आग घरात पसरू लागली. पत्नीनं आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र काही मिनिटांत आग घरभर पसरली. आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. काही वेळात आग आटोक्यात आली.
स्वत:ला संपवण्याचा कट, कार पेटवली, बॉडी सापडली; एका बाटलीनं केस फिरली; कारण ठरले 6 कोटी
घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पतीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेल्या नसल्याचं पोलिसांना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here