अकोला: अमरावती जिल्ह्यातील भातकुलीत पेट्रोल पंपासाठी लागणारे इंधन (पेट्रोल) वाहून नेणाऱ्या टँकर चालकाला हृदयविकाराचा झटका आला. टँकर चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे पेट्रोल टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर दुभाजकावर जाऊन धडकला. या घटनेत टँकर चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दुभाजकाला धडकलेला टँकर पेट्रोलने भरलेला होता. टँकर दुभाजकाला धडकल्यामुळे दुर्दैवी घटना टळली. परंतु टँकर चालकाचा मृत्यू झाला. अकोला शहरातील शहरातील सिंधी कॅम्प चौकाजवळील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलावर चढताना दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील गायगाव इथे हिन्दुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल पेट्रोलियम या तीन इंधन कंपन्यांचे डेपो आहेत. यातील भारत पेट्रोलियमच्या डेपोतून दुपारी दीड वाजताच्या सुमारास एमएच २७ एक्स ५१३४ या क्रमांकाचा टँकर अमरावती जिल्ह्यातील भातकुली पेट्रोल पंपासाठी इंधन घेऊन रवाना झाला. दरम्यान भातकुलीकडे जात असताना अकोला शहरातील अशोक वाटिका जवळील अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलावर चढताना टँकर चालकाला ह्रदय विकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले.
अरेरे! आईचा अंत्यविधी सुरू असताना आईला शोधत लेकरू रस्त्यावर; डोकं फुटलं तरीही आईचा शोध सुरुच
अनियंत्रित झालेला टँकर पुलावरून खाली कोसळत होता. सुदैवाने तो दुभाजकाला आदळल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र हृदय विकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू झाला. माणिकराव महेंन्द्रे असे वाहन चालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे टँकर पुलावरून उलटला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
दिल्लीहून पळून आलेल्या प्रेमी युगुलाचा औरंगाबादेत करुण अंत; समृद्धी महामार्गावर ट्रकनं चिरडलं
टँकरमध्ये ज्वलनशील डिझेल आणि ६ हजार लीटर पेट्रोल असल्याने आग लागण्याची दाट शक्यता होती. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखा आणि खदान पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे परिसरातील नागरिकांसह रिक्षा चालकांनी टँकर चालकाला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी वाहनचालक माणिकराव यांना मृत घोषित केले. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here