कंधौली गावचे रहिवासी असलेले सुग्रीव श्रीवास (५५) सरीला ब्लॉकमधील उपरांखा गावात २०१२ पासून कार्यरत आहेत. सध्या ते मुख्याध्यापक पदावर काम करत होते. सुग्रीव श्रीवास कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत होते. ते सोमवारी रडले होते. त्यावेळी आम्ही त्यांची समजूत काढली. त्यानंतर ते घरी गेल्याचं सहायक मुख्याध्यापक रविंद्र यांनी सांगितलं.
सुग्रीव श्रीवास मंगळवारी शाळेत आले. मात्र ते कोणासोबतही बोलले नाहीत. संपूर्ण दिवस ते शाळेच्या मैदानात बसून होते. संध्याकाळी ते घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा भानुप्रतापनं शिक्षणमित्र बलवान महेंद्र यांच्याशी संवाद साधला. वडील घरी आलेले नाहीत. अनेकदा फोन करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं मुलानं महेंद्र यांना सांगितलं. बरीच शोधाशोध करूनही श्रीवास यांचा ठावठिकाणा सापडला नाही. बुधवारी सकाळी शाळा भरली. त्यावेळी श्रीवास यांचा मृतदेह वर्गात पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.
मुख्याध्यापक सुग्रीव श्रीवास कौटुंबिक कारणांमुळे चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी जीवन संपवल्याचं पोलीस अधिकारी प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितलं. पोलीस अधिक तपास करत आहेत. श्रीवास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वर्गातच मुख्याध्यापकांचा मृतदेह आढळल्यानं विद्यार्थिनींसोबतच शिक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.