पुणे : मानसिक त्रास देत असल्याने पुण्यातील एका युवकाचा लोखंडी सळईने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात तो मृतदेह पुरला. मात्र, पोलिसांनी हा बनाव उघडा पाडला आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत जवळ असणाऱ्या कुरण गावच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८, रा. कन्याशाळेजवळ, विजय लॉज बिल्डिंग, अप्पा बळवंत चौक पुणे) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे (दोघे रा. आंबी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आधी शिव्या दिल्या, आता ओव्या गायल्या, बारामतीत जाऊन सत्तार म्हणाले, पवारांची पॉवर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणारा विजय काळोखे हा नितीन निवंगुणे याला वैयक्तिक कारणावरून मानसिक त्रास देत होता. यासाठी त्याने त्याला पुण्याला देखील भेटायला बोलावले होते. तिथून ते दोघे विजय निवंगुणे आणि नितीन निवंगुणे हे पुण्यातून गावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. मात्र, आंबी रस्त्यावरील रानवडी येथील नितीन निवंगुणे याच्या शेतातील पत्र्याचे कंपाउंड उघडे दिसल्याने ते बंद करण्यासाठी नितीन तेथे थांबला. त्यावेळी विजय काळोखे हा कंपाउंडमध्ये आला. तिथं विजय काळोखे हा नितीन याला शिवीगाळ करू लागला.

नितीन याने त्याला “शिवीगाळ करू नको,” असे सांगूनही तो शिवीगाळ करत होता. त्यावेळी नितीन याचा चुलत भाऊ विजय निवंगुणे हा तेथे आला. त्याने नितीन व मयत विजय काळोखे यांच्यातील भांडणे पाहून काय झाले, असे विचारले. त्या वेळी मयत विजय काळोखे हा विजय निवंगुणे यास शिवीगाळ करू लागला. त्यामुळे रागात विजय निवंगुणे याने शेजारी पडलेली वीट विजय काळोखे याच्या डोक्यात घातली.

त्यानंतरही विजय काळोखे हा शिवीगाळ करत या दोघांवर धावून आला. त्यानंतर नितीन व विजय निवंगुणे यांनी लोखंडी अँगल व रॉडने विजय काळोखे याला बेदम मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी एक वर्षापूर्वी खोल खोदलेला होता. त्या खोल खड्ड्यात विजय काळोखे याचा मृतदेह पुरून ठेवला होता. त्यावर गवत टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सूत्र हलवत या घटनेचा सखोल तपास केला आणि दोन्ही भावांना ताब्यात घेतले.

रायगडच्या अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडितने तोडला दम, आई, वडील बहीण संपूर्ण कुटुंब संपलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here