Nilam Gorhe: औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण औरंगाबाद शहरात (Aurangabad City) पाहायला मिळाले होते. दरम्यान गृहविभागाने ढुमे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. मात्र ढुमे यांना निलंबित करून चालणार नसून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे (Dr.Nilam Gorhe) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. 

औरंगाबाद येथील शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी लिफ्ट मागत गाडीत बसलेल्या एका महिलेशी अश्लील चाळे करत घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली आहे. यासंदर्भात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार यापूर्वीदेखील केले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करून चलणार नसून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. 

ढुमे यांना तात्काळ बडतर्फ करा! 

दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार यापूर्वीदेखील केले आहेत. यासंदर्भात नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कार्यालयीन चौकशी देखील लावली होती. याचदरम्यान ढुमे यांची बदली औरंगाबाद येथे झाली. त्यामुळे अशा महिलांशी अश्लील, असभ्यवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. यास्तव ढुमे यांना नुसते निलंबन करून उपयोग नाही. तर त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी! 

दरम्यान याचवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर देखील कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत. ज्या परिसरात उशिरापर्यंत हॉटेल सुरू असताना सुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही. अशा संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस व कामगार विभाग तसेच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यावर कारवाई देखील करण्याची सूचना सदरील पत्राच्या माध्यमातून डॉ. गोर्‍हे यांनी केली आहे. तर सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या विशाल ढुमे यांनी इतका धक्कादायक प्रकार करूनही महाराष्ट्रातील व औरंगाबाद परिसरातील महिलाच्या प्रश्नावर अनेक ईतर विषयात क्रियाशील व प्रसिद्ध राजकीय महिला कार्यकर्ते यांनी यासंबंधी कारवाईसाठी प्रयत्न केला नाही या बद्दल डॉ. गोर्‍हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

news reels New Reels

संबंधित बातम्या: 

मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here